Maharashtra Din

1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साही वातावरणात covid-19 सर्व नियमाचे पालन करत ध्वजारोहण संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डाॅ. शिवाजीराव काकडे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्वप्रथम राष्ट्रगीत संपन्न झाला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव काकडे सर यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 मे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. आजच्या दिनाचे दिनविषेश सांगत असताना महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ व मुंबईसह महाराष्ट्र कसे स्‍वातंत्र्य झालं त्यानंतर 105 हुतात्म्यांचे त्यांनी होतात्म्य कसे पत्करले . आजच्या दिनाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून विशेष नमूद केले .तर आजचे हे कार्यक्रम यशस्वी एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे संस्थापक अध्यक्षा आदरणीय अनिताजी साप्ते मॅडम, संस्थेचे सचिव आदरणीय अनिल साप्ते सर, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय आनंद साप्ते सर, संस्थेचे सदस्य आदरणीय माधव दंडवते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख. प्राध्यापक सोमनाथ स्वामी यांनी केले .धन्यवाद